
अमळनेर : तालुक्यातील जानवे येथील अनिल जुलाल भिल (वय ५०) याने बोडी गाय धरणाजवळ पळसाच्या झाडाला सुती दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. त्याला खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयताच्या भावाने खबर दिल्यावरून अमळनेर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताच्या भावाचा पोलिसांवर गंभीर आरोप…

मयत अनिल याची बुधवारी पोलिस चौकशी करण्यात आली होती. पोलिसांच्या मारहाणीमुळे तणावातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या भावाने काल केला होता. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी नातलगांना दिलेल्या चौकशीच्या आश्वासनानंतर मयतावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.




