
अमळनेर(प्रतिनिधी):- शहरातील तांबेपुरा येथील जयेश राजेंद्र पाटील यास तिघांकडून मारहाण झाल्याची घटना ३० रोजी घडली असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबेपुरा येथील जयेश पाटील हा ३० रोजी दुपारी ११.३० वाजता तांबेपुरा भागातील शिवशक्ती चौकात आपल्या मित्रांसोबत उभा होता.त्याच वेळी त्याला थार चारचाकी गाडीने मागून जोरात धडक दिली.यावेळी चारचाकी मालकाला विचारणा केली असता गाडीतून उतरत राजवीर व त्याची आई सोनी (पूर्ण नाव माहित नाही) यांनी लोखंडी रॉड ने तसेच हाताबुक्क्यानी तोंडावर,पोटावर जयेश याला मारहाण केली.जयेश याला यावेळी राजवीरचे मामा करतारसिंग यांनी देखील मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.जयेश गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ. चंद्रकांत पाटील करत आहेत.




