
अमळनेर:- लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध कार्यालये, महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.
मारवड महाविद्यालय…

ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील यांनी भुषविले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इतिहास विभाग प्रमुख डॉ. दिलीप कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप कदम महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्हि. डी. पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिलीप कदम यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रथम वर्ष वर्गातील कु.दिपाली सोपान कोळी, अश्विनी जगदीश पाटील, मोनिका प्रदिप खैरणार या विद्यार्थिनीने लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे आभार डॉ. माधव वाघमारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. डॉ. देवदत्त पाटील,प्रा. विजय पाटील, प्रा.डॉ. पवन पाटील, प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा.डॉ. संजय महाजन, श्री. जगदीश साळुंखे, डॉ.सचिन पाटील, श्री.सचिन साळुंखे, श्री. अतुल साळुंखे तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे जयंती शासकीय आश्रमशाळा पिंगळवाडे येथे साजरी...

“श्रमिकांचा शाहिर, समाजक्रांतीचा गायक”, असा लौकिक लाभलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पिंगळवाडे येथे विविध उपक्रमांनी सजलेला सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी साठे यांच्या जीवनकार्याचे सादरीकरण करत त्यांच्या विचारांचा प्रभावी उलगडा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक श्री. एम. एम. राजपुत सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बी. डी. कोळी सरांनी उपस्थिती लावली. प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. श्री. आर. जे. पाटील (प्राथमिक शिक्षक) यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवासाची सखोल माहिती दिली. त्यांनी बालपणातील संघर्ष, मजूर चळवळीतील सहभाग, व साहित्याद्वारे समाज परिवर्तनाची चळवळ यावर मार्मिक भाष्य करत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा जागृत केल्या. विशेष आकर्षण ठरले ते श्री. जे. एस. गुरव सरांचे छक्कड गायन. त्यांनी साठे यांच्या रचना पारंपरिक शैलीत सादर करत श्रोत्यांना भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन श्री. एस. एम. कुमावत यांनी केले. कार्यक्रमाची सांगता देशभक्तिपर ‘वंदे मातरम्’ च्या सामूहिक गायनाने करण्यात आली.
न्यू इंग्लिश स्कूल, प्र.डांगरी

ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, प्रं.डांगरी.ता.अमळनेर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जंयती उत्साहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रम चे अध्यक्ष स्थानी निलेश शर्मा सर तर प्रमुख वक्ते म्हणून विलास पाटील सर जि.प.शाळा.सात्री उपस्थित होते.कार्यक्रमा ची सुरुवात मान्यवरां च्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली.इयत्ता 5 वी ते10 वी च्या विद्यार्थ्यानी भाषण दिली.शाळेचे मुख्याध्यापक राकेश पवार सर यानी आपले विचार मांडतांना “जग बदल घालूनी घाव , सांगून गेले मला भिमराव “या गाण्याच्या ओळीने आपले मार्गदर्शन केले.प्रमुख वक्ते विलास पाटील सर यांनी जीवनातील साध्या घटनांच्या माध्यमातून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या बदल विचार मांडलेत. अध्यक्षीय भाषणात निलेश शर्मा सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या चतुःसुत्री व अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळी बाबतीत सविस्तर माहिती देताना अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीतील घोषणा ,ये आज़ादी झूठी है,देश कि जनता भूखी है। असे अनेक उदाहरण देऊन माहिती दिली.कार्यक्रमा चे सूत्रसंचालन महेंद्र पाटील सरांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यास जेष्ठ शिक्षक पी.व्ही. साळुंखे, एस.बी. वाडीले, जे.एन.करंदीकर, श्रीमती.पी. के.सोनवणे,राजन शिंदे आदींनी सहकार्य केले.
के. डी. गायकवाड माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी…

आम्हीही माणस आहोत, आम्हालाही स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसुन कष्टकरी दलित व शेतकरी यांच्या तळहातावर तरलेली आहे. अशी गर्जना करणारे आण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन वक्त्या सौ. अनिता संदानशिव यांनी केले. युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या अंतर्गत पैलाड भागातील के. डी. गायकवाड हायस्कुल येथिल कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेतील वरिष्ठ शिक्षक श्री. एम. आर. सोनवणे सर होते. अध्यक्ष यांनी आपल्या खास भाषणाच्या शैलीतून विद्यार्थ्यांसमोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडला. तसेच शाळेतील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भाषण मध्ये सहभाग घेऊन आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर भाषणे देऊन मान्यवरांचे मने जिकंली. सुत्र संचालन श्री. जे. एस. पाटील सर,प्रमुख पाहुणे यांचा परिचय श्री. डि. एस. पाटील सर तसेच आभार प्रदर्शन श्री. विवेक पाटील सर यांनी केले. कार्यक्रमसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
लोकमान्य शिक्षण मंडळाचा हीरक महोत्सव

अमळनेर येथील लोकमान्य शिक्षण मंडळाचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी नवीन मराठी शाळा व बाल विकास मंदिर या दोन्ही शाळांतर्फे संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात संस्थेचा इतिहास, वर्तमान वाटचाल व भविष्यातील धोरणाविषयी विद्यार्थी व पालकांना माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील व संस्थेचे चिटणीस विवेकानंद भांडारकर यांनी आपल्या संस्थेविषयीच्या भावना व्यक्त केल्या.नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई सर यांनी शाळेच्या भविष्यातील धोरणांविषयी माहिती दिली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. वर्धापन दिन कार्यक्रमासोबतच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्त भाषणाचा कार्यक्रम करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहात भाषणे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल मार्कंडेय सर यांनी केले.




