
स्व.मोहम्मद रफी पुण्यतिथी निमित्त रंगला सूर-संगम म्युझिकल ग्रुपचा कार्यक्रम
अमळनेर-स्व.मोहम्मद रफी यांचे पुण्यतिथी निमित्त
फलसका प्यार का तुम क्या जानो,,तारीफ करू क्या उसकी,,रुक जा ये हवा,,पल पल दिलके पास आदी अमळनेर भूमीतील गायकांनी एका पेक्षा एक सुरेल गीत सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.यामाध्यमातून स्व.रफिजीना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सुनिल वाघ प्रस्तुत सूर-संगम म्युझिकल ग्रुप तर्फे सुमधुर अशा नव्या व जुन्या अजरामर हिंदी गीतांचा कार्यक्रम “दिल की आवाज”चे आयोजन शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले होते.सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व.रफी यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे वैशिट्य म्हणजे यात खास करून स्थानिक गायक कलाकारांना संधी देण्यात आली होती.विशेष म्हणजे यात काही नवोदित गायकांनी पहिल्यांदाच मोठ्या मंचावर गीत सादर करून उपस्थितांची वाहवाह मिळवली.यावेळी प्रामुख्याने ऑर्गनायझर सिंगर सुनिल वाघ यांच्यासह सिंगर उज्वल पाटील,अनिल वानखेडे, सुनिल भोई,सौ सुनीता मोरे,श्याम संदानशिव,सुनंदा चव्हाण,शिवानी वाघ यांनी अनेक सुरेल गीत सादर केलीत.गायकांना प्रोत्साहन म्हणून अनेकांनी बक्षिसाची लयलूट केली.आयोजक सुनिल वाघ व त्यांची कन्या शिवानी वाघ या दोघांच्या गीतांना विशेष दाद मिळाली तर निवेदिका अँकर म्हणून सौ पूजा शाह व सिकंदर यांनी प्रत्येक गाण्याचे सविस्तर विश्लेषण करून कार्यकमात खूपच रंगत आणली. साऊंड अरेंजमेंट म्हणून विजय शुक्ला व इतर कलाकारांनी साथसंगत दिली.
यावेळी सदर कार्यक्रमासाठी विशेष मदत करणाऱ्या डॉ मनीषा भावे,डॉ मनीषा पाटील,सौ माधुरी पाटील, पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व पुरुष बांधव उपस्थित होते.
दरम्यान सुनिल वाघ यांच्या सूर- संगम म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून स्थानिक नव्या गायक कलाकाराना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित श्रोत्यांनी व्यक्त केली.




