
अमळनेर – महसूल सप्ताह निमित्त ५ रोजी संध्याकाळी ५ वाजता चोपडा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल दोघेही तालुक्याचे तहसीलदार, नायक तहसीलदार, प्रांत कार्यालयातील कर्मचारी, सर्कल, पोलीस पाटील,तलाठी, कोतवाल, शिपाई अशा प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानपत्र देण्यात आले. त्यात तालुक्यातील सहा पोलीस पाटलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले, त्यातील श्री. भागवत पाटील मंगरूळ, श्री. विलास पाटील जानवे, श्री.संजय पाटील पळासदळे, श्री.रवी पवार गंगापुरी, सौ. तनुजा पाटील लोणखुर्द, श्री गणेश भामरे ब्राह्मणे अशा सहा पोलीस पाटलांना प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले त्यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस पाटील, आणि संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते.




