
अमळनेर : येथील पिंपळे रोड चे रहिवासी मुंबई येथील अँटॉप हिल पोलीस स्टेशनचे कर्मचारी अविनाश राजेंद्र सोनवणे यांचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची घटना ७ रोजी सकाळी मुंबई येथील मॅक्सीलाईफ हॉस्पिटल मध्ये घडली.
अविनाश सोनवणे हे ६ रोजी कर्तव्यावर असतांना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. ७ रोजी त्यांचा डेंग्यू मुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांचे शव अमळनेर येथे वामननगर येथील घरी आणण्यात येणार आहे. त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात येणार आहे. त्यांच्या मागे आई वडील , पत्नी , दोन बहिणी, मुलगा , मुलगी असा परिवार आहे.

