
कळमसरेत व्यापारी गाळाचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न…
अमळनेर:- आज मी दुसऱ्यांदा आमदार झालो. जिल्हा परिषद सदस्य ते मंत्री पदाचा माझा आता पर्यंतचा प्रवास सुरु असून कळमसरे गाव नेहमी माझ्या पाठीशी आहे. कारण माझ्या राजकारणाची सुरुवातच सन 2002 साली कळमसरे गावापासून झाली असून जिल्हा परिषद निवडणुकीत मोलाचे सहकार्य केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांनी कळमसरे येथील वि.का. सहकारी सोसायटीच्या व्यापारी गाळ्यांच्या लोकार्पण केले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील,बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पिरन पाटील, संचालक प्रा. सुभाष जिभाऊ, डॉ. अनिल शिंदे, समाधान धनगर, प्रफुल्ल पाटील, सचिन बाळू पाटील, विजू आप्पा,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील,पाडळसरे येथील माजी सरपंच सचिन पाटील, भूषण पाटील, संजय पाटील डांगरी सरपंच अनिल शिसोदे, सरपंच जगदीश निकम, जिल्हा बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक अनिल अहिरराव,भाजपा पदाधिकारी राहुल पाटील, बोहरा येथील उत्तमराव पाटील, निम येथील डॉ. एल. डी. पाटील , जे. के. पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की तालुक्यातील जनतेने माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास ठेवून आमदार केले आहे. यासाठी मी शेत शिवार व पाणंद रस्ते, शेत सिंचनासाठी पाडळसरे प्रकल्प, उपसा जल सिंचन योजना, सी. आर. एफ. फंडातुन तालुक्यात रस्ते या प्रमुख गरजा असून लवकरच पूर्णतःवास येतील.
खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, कळमसरे वि. का. सोसायटीने व्यापारी गाळ्यांचा घेतलेला निर्णय खरोखर कौतुकास्पद आहे. अनिल दादा पहिल्याच टर्म मध्ये कॅबिनेट मंत्री झाल्याने पाडळसरे धरणाला अनिल दादांच्या प्रयत्नांनी सुप्रमा मिळाली. आणि नुकतेच पाडळसरे धरण प्रकल्प पी. एम. के. एस. वाय योजनेत समाविष्ट झाल्याने 859 कोटीचा निधीला मंजुरी मिळाली आहे. अमळनेर ते श्रीक्षेत्र कपिलेश्वर रस्ता व निम ते मांजरोद तापी नदीवरील पुलासाठी मंत्री नितीन गडकरी यांची लवकरच भेट आमदार अनिल दादा पाटील व मी घेणार असल्याचेही खासदार स्मिता वाघ म्हणाल्या. यावेळी वि. का. सोसायटीचे चेअरमन, व्हॉईस चेअरमन व संचालक मंडळाने खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाला वि. का. सोसायटी चेअरमन सुनील देवनाथ पाटील, व्हॉइस चेअरमन अशोक चौधरी, माजी चेअरमन बाबुलाल पाटील, रमेश चौधरी, संचालक जितेंद्र राजपूत, दिपचंद छाजेड, जयदीप गिरासे, नरेंद्रसिंग पाटील, जगन्नाथ चौधरी, शोभाबाई महाजन, काशिनाथ भिल, मंगलाबाई बडगुजर, सचिव सुधाकर पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत पाटील, सूत्रसंचालन देवेंद्र महाजन यांनी केले. यावेळी कळमसरेसह परिसरातील ग्रामस्थ व पत्रकार बांधव उपस्थित होते.




