
अमळनेर : गोगादेव छडी मिरवणुकीत दोन गटाच्या छड्या एकमेकांसमोर आल्या नंतर दोन गटात हाणामारी होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. मात्र पोलिसांनी तात्काळ जमाव नियंत्रणात आणला.२३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोगादेव उत्सवाची छडी मिरवणूक समोरासमोर आले असता एका गटातील लोकांनी शिवीगाळ सुरू केली. आणि मारहाण सुरू केली. सनी राजू जाधव ,विनोद टिल्लू जाधव व छोटू विनोद जाधव यांनी लाठ्या काठ्या आणून मारायला सुरुवात केली. नितेश विकास जाधव यांनी हातातील सुऱ्याने भगत सुनील चिरावंडे याला पोटाला चाकू मारला आणि विकास उर्फ बुद्धा टिल्लू जाधव याने सुऱ्याने राकेश कल्याणे याच्या हाताच्या कोपऱ्याला वार केला , तर पल्लू घारु (विकास जाधव याचा जावई) , करण विनोद जाधव , सनी राजू जाधव , आकाश जगन जेधे , राजा सुनील खरारे यांनी नरेश कालू कल्याणे च्या डोक्याला काठी मारून जखमी केले. राजेश पापाराम दाभोळे याने राजेश रवी चव्हाण याच्या पाठीवर आणि शक्ती दाभोळे याने मनीष लोहरे याच्या दंडावर काठीने मारून दुखापत केली. तसेच आकाश जेधे , करणं जाधव , राजा खरारे ,राजेश दाभोळे दिपू खरारे, दिनेश खरारे , शक्ती दाभोळे , विशाल जाधव , सागर भुरट, पक्या दाभोळे , राकेश दाभोळे , सुकलाल भुरट , अनिल बेंडाळे , सिद्धार्थ दाभोळे ,जगन जेधे , अर्जुन भुरट यांनी शिवीगाळ केली व मनिष सह मिरवणुकीतील मित्रांना मारहाण केली.
घटनेचे वृत्त कळताच पो नि दत्तात्रय निकम ,एपीआय रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , पो उ नि नामदेव बोरकर ,पो उ नि युवराज बागुल , पो उ नि शरद काकळीज , हे कॉ गणेश पाटील , सिद्धांत शिसोदे , अमोल पाटील , मिलिंद सोनार , जितेंद्र निकुंभे , विनोद संदानशिव , प्रशांत पाटील , उज्वल म्हस्के , चरण पाटील , हर्षल पाटील , संजय सोनवणे , नितीन कापडणे , सुनील तेली ,संजय बोरसे यांनी तातडीने जमावत घुसून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जमाव पांगवला. पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. तिन्ही जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.




