
अमळनेर:- तालुक्यातील पातोंडा येथील शेतकरी सर्जेराव संतोष बिरारी (वय ५२) हे शेतात पीक पाहणी साठी जात असताना नांद्री -पातोंडा दरम्यान असलेल्या नाल्यात पाय घसरल्याने वाहून गेले होते. ते गेल्या दोन दिवसांपासून सापडत नव्हते. १९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावापासून दोनशे मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला.
गेल्या दोन दिवसांपासून पातोंडा-नांद्री येथील नाला ओसंडून वाहत होता. सर्जेराव बिरारी यांचा शोध ग्रामस्थ व प्रशासन घेत होते. दरम्यान आज नाल्याचे पाणी कमी झाल्याने ते गावापासून काही अंतरावर सापडले. त्यांचा मृतदेह नाल्यात गाळात अडकलेला आढळला. यावेळी अमळनेर पोलिसांनी पंचनामा करून डॉ. जी. एम.पाटील यांनी जागेवरच शवंविच्छेदन करून त्यांच्यावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्यात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान प्रांतधिकारी नितीन मुंडावरे हे गेल्या दोन दिवसांपासून महसूल कर्मचाऱ्यांची टीम पाठवीत पूर परिस्थितीचा आढावा घेत होते.




