
अमळनेर:- रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था, अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटपाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ व एकलपालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा किट व प्रोटीन किट भैय्यासाहेब विनोद पाटील माजी नगराध्यक्ष यांच्या कडून ३० प्रोटीन किट देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप भावसार सर होते. व या महिन्यातील सकस आहार किट आधार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ३० किराणा कीटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मागील 6.वर्षा पासुन सलग सुरू आहे. यात दर महिन्याला ह्या मुलांना हे किट देण्यात येते.
आजच्या कार्यक्रमांचे प्रास्ताविक आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ भारती पाटील यांनी केले त्यांनी मुलांशी आरोग्य विषयक संवाद साधत दाते व रोटरी आणि आधार संस्थाने सर्व मुलांना किराणा किट उपलब्ध करून दिले त्यांनी आपल्या मनोगतातून आज इतक्या मुलांपर्यंत पोहोचल्याने मदत केल्याचे खरे समाधान मिळत आहे. मुलांना दर महिन्याला प्रोटीन किट व सकस आहार वाटणे गरजेचे असल्याने दात्यांनी या कार्यक्रमाशी जुळावे व गरजू मुलांपर्यंत आपली मोलाची मदत पोहोचवावी, असे आवाहन डॉ. भारती पाटील यांनी केले आधार संस्थेचे कार्यकारी संचालक रेणु प्रसाद व रोटरी क्लबचे .नवनिर्वाचित अध्यक्ष सनी कोठारी व रोटरी क्लबचे सेक्रेटरी व रोटरी क्लबचे जेष्ठ सदस्य विवेक देशमुख तसेच रोटरीयन श्री प्रतिक जैन किशोर लुल्ला, वृषभ पारेख, देवेंद्र कोठारी, रोहित सिंघवी कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय कापडे, राकेश महाजन, अश्विनी सुर्यवंशी, पुनम पाटील, तौसिफ शेख, विक्की सिरसाठ यांनी प्रयत्न केले व कार्यक्रमांचे सुत्र संचालन संजय कापडे यांनी केले.




