
चेअरमन पदी दिलीप पाटील तर व्हॉईस चेअरमनपदी सुदाम शिंदे यांची बिनविरोध निवड संपन्न…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची २३ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.

मारवड विकासो कार्यालयात चेअरमनपदी दिलीप गुलाबराव पाटील तर व्हॉईस चेअरमन पदी सुदाम शामराव शिंदे यांची बिनविरोध निवड २३ रोजी करण्यात आली. यावेळी संचालक शरद वामन पाटील, राकेश गोविंदराव मुंदडा, गुलाब गंगाराम पाटील, संजय पुना पाटील, अनिल साहेबराव पाटील, उमेश जिजाबराव सुर्वे, पंकज कांतिलाल लोहार, एकनाथ बाविस्कर, ग.भा. आंनदीबाई भिका चौधरी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून सुनिल महाजन यांनी काम पाहिले. निवडीप्रसंगी संजय भदाणे, सुरेश निळकंठ पाटील, बापू बंडू भामरे, भगवान भामरे, निंबा आनंदराव शिंदे, पुनचंद बळीराम शिंदे, नाना माधवराव शिंदे, विनोद दंगल शिंदे, उमाकांत पाटील, प्रकाश पाटील, शांताराम शामराव पाटील,राजेंद्र साळुंखे, हरीभाऊ मारवडकर, भगवंत पुंडलिक पाटील, संदिप ताराचंद पाटील, अनिल पाटील, दिनेश पाटील, रुपेश साळुंखे, गोकुळ साळुंखे, योगेश पाटील यांच्यासह मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील सर्व सभासद व शेतकरी मंडळी उपस्थित होते.सेक्रटरी सुनिल पाटील व कर्मचारी अनिल पाटील इतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. नवनिर्वाचित चेअरमन व व्हॉईस चेअरमन यांचे मारवड पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.




