
प्रभाग रचना नियमबाहय असल्याने रद्द करण्याची मागणी
अमळनेर-आगामी पालिका निवडणूकीसाठी शहराची झालेली प्रभाग रचना नियमबाह्य असल्याची हरकत घेत सदर रचना रद्द करावी या मागणीचे निवेदन आमदार श्री शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीच्या वतीने नपच्या मुख्याधिकारीना देण्यात आले.
यात म्हटले आहे की नुकतीच नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अमळनेर नगरपरिषदेने प्रभाग रचना घोषीत केली आहे. सदर प्रभाग रचना करतांना राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या नियम व अटी नुसार प्रभाग रचना न झाल्याचे निर्देशनास येत आहे.यात प्रामुख्याने भौगोलिक सिमाचा विचार करणे बंधनकारक असतांना त्याचे पालन झालेले नाही. नद्या, नाले ओलांडून प्रभाग तयार करण्यात आले आहे. रेल्वे रुळ ओलांडून प्रभाग सिमा आखण्यात आलेली आहे.,वस्त्यांचे ठरवून विभाजन करण्यात झाल्याचे दिसत आहे.,प्रगणक गट फोडण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. तरी झालेली प्रभाग रचना राजकीय हेतूने हेतुपुरस्कर, नियमांचे उल्लघन करून झाल्याने तात्काळ प्रभाग रचना रद्द करून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचा नियमानुसार प्रभाग रचना करावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना गटनेते प्रविण पाठक, रणजीत भिमसिंग पाटील,चंद्रकांत कंखरे, भरत पवार, नसिरोद्दीन हाजी शरफोद्दीन जाकीर मेवाती, गुलाबनबी पठाण,भूषण पाटील, सागर विसपुते, राहुल कंजर, विपुल पाटील, सनी चव्हाण, शुभम यादव, मनोज शिंगाने, पंकज चौधरी, अनिल महाजन, नरेश कांबळे, नईम पठाण आदींची उपस्थिती होती.




