
अमळनेर : नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १२ व १३ च्या रचनेत नियमांचा भंग करण्यात आला असून अल्पसंख्यांक समाजाचे विभाजन करण्यात आले असल्याचा आरोप करत शेख सलीम शेख फत्तु यांच्यासह अनेक नागरिकांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यांच्याकडे हरकत नोंदवली आहे.
प्रभाग १२ मधील जोडला गेलेला वाडी संस्थान परिसर , गुरव गल्ली ,माळी मढी जवळील परिसर हा शहरातील मुख्य बोरी नदी ओलांडून प्रभाग १२ ला नियमबाह्य जोडला गेला आहे. हा भाग नैसर्गिक रित्या प्रभाग १३ ला जोडणे उचित होईल. या प्रभाग रचनेत सीमांच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या मतांचे विभाजन करण्यात आले असून डीपी रोड देखील ओलांडून नियमबाह्य पद्धतीने प्रभाग १२ ला जोडण्यात आला आहे अशी हरकत हाजी शेखा मिस्त्री, फिरोज मिस्री,मुशीर खान,सलीम टोपी, अमीर खा मिस्त्री ,साबिर पठान, रफीक मिस्त्री, आरिफ पठान,गुलाम नबी , इम्रान खाटीक, अफरोज मिस्त्री,दबीर पठान,सईद हाजी,अफसर पठान,नदीम शेख, अजहर अली,अमीर खान,समीर खान,अलाउद्दीन शेख, अल्तमज शेख यांनी घेतली आहे.
त्याचप्रमाणे मुशीर शेख यांनीही बोरी नदीच्या पूर्वेकडील काठावर लागून असलेला परिसर प्रभाग १२ मधून तोडून भोई मळी ते इच्छामन्दिर चौक , दत्तू कोळी यांच्या घरापासून ते चंदनपीर चौक व बंडू भोई घरापर्यंत परिसर जुन्या प्रभाग रचनेप्रमाणे जोडण्यात यावा , नियमबाह्य बेकायदा प्रभाग रचना तशीच राहिल्यास लोकप्रतिनिधींकडून नागरिकाना न्याय मिळणार नाही असेही त्यांनी हरकतीत म्हटले आहे.
त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वस्त्यांचे विभाजन होणार नाही असा नियम असताना आकस बुद्धीने ,तथा राजकीय हेतूने जपान जीन हा भाग प्रभाग २ मध्ये तांबेपुरा भागात समाविष्ट केल्याने मतदानासाठी जाण्यासाठी मार्ग नाही. नुकतीच रेल्वे विभागाने तांबेपुरा भागाकडे जाणारा रस्ता बोगदा बंद केला आहे. त्यामुळे जपान जीन आणि मेहतर कॉलनी हा भाग पूर्ववत प्रभाग ५ ला जोडण्यात यावा अशी हरकत माजी नगरसेवक सलीम टोपी यांच्यासह अनेक नागरिकांनी घेतली आहे.




