
अमळनेर : जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीतर्फे मयत सभासद अनिल धनुरे यांच्या वारसांना तीन लाख ४० हजार २९२ रुपयांचा धनादेश देण्यात आला.
स्व अनिल धनुरे हे शहापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. अकस्मात आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई , पत्नी , मुलगा , मुलगी असा परिवार असून कमावता सदस्य गेल्याने कुटुंबाच्या वारसाला मदत व्हावी म्हणून जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांची पतपेढी तर्फे सदस्यांतर्फे मदत निधी म्हणून अडीच लाख रुपये , पतपेढी तर्फे ५० हजार रुपये आणि सभासद वर्गणी शेअर रक्कम ४० हजार २९२ रुपये अशी एकूण ३ लाख ४० हजार २९२ रुपयांचा धनादेश स्व अनिल धनुरे यांच्या पत्नी संगीता धनुरे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रगती गटाचे रावसाहेब पाटील , चेअरमन सचिन वाघ , अशोक इसे , यशवंत शिंदे , अशोक मोरे , किरण शिसोदे , संजय पाटील, कर्मचारी रामराव पाटील हजर होते




