
अमळनेर: 24 ऑगस्ट रोजी उज्वल फाउंडेशन,आर जी मीडिया ,अथर्व आयुर्वेदिक क्लिनिक अमळनेर नगर परिषद अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू माती गणपती कार्यशाळा ढेकू रोड परिसरातील ओमकारेश्वर महादेव मंदिर लक्ष्मी नगर येथे घेण्यात आली.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन अविनाश बोरसे यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. लीना अतुल चौधरी, नरेंद्र पाटील, अशोक पाटील, शांताराम सूर्यवंशी होते. कार्यक्रमाचे आयोजन उज्वल फाउंडेशनचे दिलीप पाटील, सुदर्शना शिसोदे, आरजी मीडिया अविनाश बोरसे यांच्याकडून करण्यात आले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली. तसेच अथर्व क्लिनिक यांनी सहकार्य केले तसेच वैशाली पाटकरी, भाग्यश्री थोरात, कासार सर यांचे सहकार्य लाभले. पर्यावरणपूरक गणपती आपल्या हाताने बनवण्याची एक संधी मिळून विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.




