
अमळनेर:- पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पारोळा पोलिसांनी बनावट दारूचा कारखान्यावर छापा टाकत सुमारे ४० लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पारोळा तालुक्यात बहादरपूर येथे बेकायदेशीर देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप याना मिळल्यावरून त्यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची परवानगी घेऊन डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक सानप, अमोल दुकळे , सुनील हटकर, महेश पाटील, डॉ शरद पाटील, प्रवीण पाटील , अनिल राठोड, अजय बाविस्कर , आकाश माळी , विजय पाटील, शेखर साळुंखे, वेलचंद पवार, संजय पाटील आदींच्या पथकाने धाड टाकून बहादरपूर येथील बोरी नदीच्या काठावरील पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेला देशी दारूचा बेकायदेशीर कारखाना उध्वस्त केला.
राकेश छगनलाल जैन, टिन्या डेंगऱ्या पावरा, कितारसिंग गण्यासिंग पावरा या तिघांना ताब्यात घेऊन त्याच्याजवळून आर ओ मशीन, मिक्सर मशीन, पाणी लिफ्टिंग मशीन, स्टेबिलायझर मशीन, बॉटल सिलिंग व पॅकिंग मशीन, तसेच दारूच्या बाटल्या, मालवाहू गाडी, एक कार, पत्र्याचे शेड असा एकूण ४० लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.




