
अमळनेर-शहरात काल सायंकाळी झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे जुना बस स्टँड परिसरातील वसाहतीत व घरामध्ये घुसल्याने गोरगरीब कुटुंबियांचे बरेच नुकसान झाले.
याठिकाणी फायनल प्लॉट 123 मध्ये पालिकेने नव्याने उभारलेल्या व्यापारी संकुलाच्या बांधकामात पुढील गटार तुंबली गेल्याने व संकुलाच्या मागील बाजूस पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नसल्याने मोठ्या प्रमाणात वसाहतीमध्ये पाणी घुसल्याने हेच पाणी गोरगरीब लोकांच्या घरामध्ये शिरले.सदर बाब या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर याना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाची टीम रवाना केली.आरोग्य निरीक्षण श्री कंडारे यांचे सह मुकादम अनिल बाविस्कर व कर्मचारी यांनी तात्काळ भर पावसात जेसीबीच्या साहाय्याने पाण्याचा निचरा करणे सुरू केले.मोठी गटार कोरण्यासह मागील बाजूस चारी केल्याने वसाहतीतील पाण्याची पातळी कमी होऊन घरातील पाणीही निघाले, यासाठी पर
रीसरातील तरुण कार्यकर्त्यांचीही मदत झाली.
दरम्यान यामुळेच गोरगरीब कुटुंबायांच्या घरातील संसारपयोगी वस्तू खराब झाल्या असून यापुढे असाच पाऊस झाल्यास याचप्रकारे पुन्हा पाणी शिरू नये म्हणून पालिकेने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




