
अमळनेर : भावाकडे गेलेल्या महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्याने ८० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान भोईवाडा भागात घडली.
ज्योती शामराव चौधरी ही महिला आपल्या भावाकडे पाचोरा येथे गेलेली होती. तिच्या जेठाणीला खिडकीचे गज वाकवलेले दिसले. महिलेने घरी येऊन पाहिले असता तिच्या घरातील कोठीला लावलेले कुलुप तोडलेले दिसले. कोटीतील १२ ग्रॅम सोन्याचा तुकडा व चार ग्रॅम सोन्याच्या चार बाह्या असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.




