
अमळनेर:- तालुक्यातील धार येथील रज्जाकीया मस्जिदचे इमाम हे मक्का मदीना जाणार असल्याने त्यांचा मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अलीम मुजावर, मा. चेअरमन व्ही एन मुजावर, हाजी नईम मुजावर, बाबु पेंटर, जाकीर शेख, निमन मुजावर, अजीम भाई, शौकत अली, मुन्ना मुजावर, असलम मुजावर, सत्तार मुजावर, हाजी कलीम मुजावर, नासिर मुजावर, जुबेर मुजावर, धार गावाचे माजी सरपंच गणेश धोंडू पाटील, संजय पाटील, यशवंत पाटील, मिलींद पाटील, अरुण भाईदास पाटील यासह धार ग्रामस्थांनी सत्कार केला. तसेच माजी आमदार डॉ बी एस पाटील यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी फोनद्वारे शुभेच्छा देत सद्भावना व्यक्त केल्या.




