
अमळनेर:- तालुक्यातील जवखेडे येथे दि. ३० रोजी प्रा. कुणाल राजेंद्र पाटील व एकता मित्र मंडळ, तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराची सुरुवात सकाळी ८ वाजता ज्ञानवर्धिनी अभ्यासिका येथे झाली. रक्तदान हे जीवनदान असून, यामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत मिळते या प्रामाणिक उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले . यावेळी निवृत्ती संतोष पाटील, प्रभाकर ताराचंद पाटील, श्यामकांत गोपीचंद पाटील, राजेंद्र गुलाबराव पाटील, डॉ. दीपक पाटील मांडळ, भिकन नफ्फर पाटील, भिकन गजमल पाटील,मनोज आत्माराम पाटील, नेताजी वसंतराव पाटील, प्रशांत पुरुषोत्तम पाटील, मयूर चंद्रभान पाटील, अनिल शांताराम पाटील, चुडामन प्रकाश पाटील, सुनील गुलाब पाटील, दिलीप फकीर पाटील,दिनेश नानागिर गोसावी, रामभाऊ आनंदा पाटील, प्रमोद अशोक पाटील, सुरेश पुना पाटील, श्रीराम शालीक पाटील व गावातील इतर सर्व गणेशोत्सव मंडळातील सदस्य व सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे उपस्थित होते.
या शिबिरात एकूण 50 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. संकलित झालेले रक्त जीवनश्री रक्ताकेंद्र यांना सुपूर्द करण्यात आले.
रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रमाणपत्र व 20 ली. पाण्याचा जार प्रा कुणाल राजेंद्र पाटील यांच्या सौजन्याने भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
अश्या प्रकाराच्या शिबिरामुळे समाजामध्ये रक्तदानाचे महत्त्व आणि गरज याबद्दल जागरूकता निर्माण होऊन . या उपक्रमांमुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.




