
स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने वेळीच वीज पुरवठा खंडित झाल्याने वाचले प्राण…
अमळनेर : एबी स्विच चालू करून डी ओ टाकायला गेलेल्या वीज मंडळाच्या बाह्य स्रोत कर्मचारी विजेचा शॉक लागून डीपी वर चिकटल्याची घटना १ सप्टेंबर रोजी वासरे येथे घडली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने वेळीच वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.
कळमसरे वीज केंद्रात बाह्य स्रोत कर्मचारी असलेले दिनेश गुलाब चौधरी रा जळोद हा वासरे येथे काहीतरी कामानिमित्त डीपी वर डिओ काढून काम करीत होता. त्यावेळी त्याने एबी स्विच बंद केले होते. पुन्हा काहीतरी काम अपूर्ण राहिले म्हणून त्याने पुन्हा एबी स्विच बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र ते बंद झालेले नसल्याने त्याला विजेचा शॉक बसला आणि तो डीपी वर चिकटला व तडफडू लागला. परंतू त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या दीपक पांडुरंग पाटील यांचे लक्ष गेल्याने त्यांनी कळमसरे वीज केंद्राला फोन करून वीज कनेक्शन बंद करण्यास सांगितले. लागलीच जिजाबराव पाटील , न्हानभाऊ वना भिल , विनोद पाटील , संजय पाटील , दीपक पाटील , सुरेश पाटील , एकनाथ पाटील , अंकुश पाटील ,दीपक भीमराव पाटील यांनी त्याला डीपीवरून खाली उतरवले आणि तातडीने डॉ अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी आणले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले असून तब्येतीत सुधारणा झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने दिनेश याचे प्राण वाचले आहेत. सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.




