
अमळनेर : नाशिक येथील धनदीप बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिक्षक दिनानिमित्त महिलांसाठी भव्य निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
निबंधाचे विषय पुढीलप्रमाणे आहेत “शिकलेली स्त्री – कुटुंबाची आणि राष्ट्राची आधारशिला” ,”आजच्या युगात महिलांचे शिक्षण किती महत्त्वाचे?” , “शिक्षणामुळे घडणारी स्त्री: काल, आज आणि उद्याचे चित्र” ,आजची महिला आणि सोशल मिडिया , माझ्या आयुष्यातील एक आदर्श महिला व्यक्तीमत्व
या विषयावर निबंधासाठी शब्द मर्यादा सुमारे ८०० शब्द आहे. निबंध कागदावर लिहून खालील व्हाटस् अप नंबरवर ७ सप्टेंबर पर्यंत पाठविण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहेत. निबंध स्पर्धेचा निकाल १५ सप्टेंबर पर्यंत जाहीर करण्यात येईल.
निबंध छाया इसे ९४२०११२४४७, यमुताई अवकाळे पाटील (९५१८७४७०१५) , रेखा वाल्मीक पाटील (९४२११६४५५२) यांच्याकडे पाठवण्यात यावेत. पहिले तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांकाना पारितोषिक व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू नवरात्री उत्सवाच्या काळात एका नियोजित कार्यक्रमात दिल्या जातील .




