
अमळनेर : बांधकामासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात पडलेल्या मोकाट बैलाची अग्निशमन दलाने सुटका केली आहे.
शहरातील धुळे रोड लगत असलेल्या विद्यानगर भागात इमारतीचे मोठे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी खोदलेल्या मोठ्या खड्यात पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे बांधकाम काही दिवसांपासून बंद आहे. २ रोजी एक मोकाट फिरणारा बैल त्यात पडला आणि अडकून पडला. बराच वेळ बाहेर पडण्याचा प्रयत्न करून देखील बैलाला बाहेर निघता आले नाही. संजय पाटील यांनी अग्निशमन दलाला कळवले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी तातडीने पथकाला पाठवले. अग्निशमन दल प्रमुख गणेश गढरी , दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , जाफर पठाण , आकाश संदानशीव, लखन कंखरे यांनी बैलाला बाहेर काढुन सुटका केली.




