
तालुका काँग्रेस कमिटीकडून तहसीलदारांना निवेदन…
अमळनेर:- तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सतत पाऊस व अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. त्यांचा पंचनामा करून तात्काळ मदत द्या या आशयाचे निवेदन अमळनेर तालुका काँग्रेस पक्षाने १ सप्टेंबर रोजी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, २३, २४ ऑगस्ट पासून सर्वत्र भरपूर पाऊस होत आहे. सदर पावसामुळे, अमळनेर तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन पूर्णता विस्कळीत झालेले असून, नुकसान देखील झालेले आहे. त्यात तालुक्यातील शेतीवरील मूग, उडीद, कापूस आदी पिकांना धक्का बसला असून भविष्यातील उत्पादनात ८०% पेक्षा जास्त घट येऊन नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील ग्रामीण भागातील कच्चे, पक्के रस्ते देखील अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहेत. त्यात पाणंद रस्ते १००% खराब झालेले आहेत. त्यांचे डागडुजीचे काम त्वरित सुरू होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील रहिवासी व इतर घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. रहिवाशी घरांची पडझड झाल्याने बाधित रस्त्यावर आलेले आहेत. अशा परिस्थितीत तालुक्यातील जनता सर्व बाजूंनी बाधित झालेली आहे. त्याचा परिणाम आता दिसत असून, भविष्यातही दिसणार आहे म्हणून आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे की, तालुक्यातील शेती, घरे, रस्त्यांची परिस्थिती लक्षान घेऊन, अमळनेर करांच्या व शेतकऱ्यांच्या सर्व नुकसानीचे त्वरित पंचनामे व्हावेत व शासन दरबारी अहवाल पाठवून अमळनेर तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, गजेंद्र साळुंखे, मनोज पाटील,संदीप घोरपडे,भटू पाटील यांच्या स्वाक्षऱ्या असून याप्रसंगी सुलोचना वाघ, बन्सीलाल भागवत,शांताराम शामराव पाटील, प्रा.शाम पवार, कैलास पाटील,के व्ही पाटील, प्रवीण जैन, शेखा मिस्तरी, त्र्यंबक पाटील, अमित पाटील, तुषार संदानशिव, भगवान संदानशिव, कन्हैयालाल कापडे, रोहिदास कापडे, धोंडू महाजन, भास्कर बोरसे, एड. डी.वाय. पाटील, पितांबर पाटील, कृष्णा पाटील, अनिल पाटील, विठ्ठल पवार, आर पी चौधरी, राजू भाट, व्ही.सी पाटील, गजानन साळुंखे, अधिकार पाटील, ज्ञानेश्वर कोळी, पितांबर पाटील, भावलाल पाटील, संतोष पाटील अनिल माधवराव पाटील गुणवंत पाटील, राजेंद्र पाटील, पी वाय पाटील, फरीद खान, निसार खान, भावलाल चुडामन पाटील, गुलाब जयदेव पाटील, तनवीर शेख, विश्वनाथ ठाकरे, दिलीप पाटील, सुखदेव होलार, शालिग्राम पाटील,रामकृष्ण नामदेव पाटील, श्रीराम पाटील भास्कर बोरसे, भगवान पाटील,या सह अनेक काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.




