
आयोगाने नेमून दिलेल्या सीमांच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची नागरिकांची तक्रार
अमळनेर : शहरातील प्रभाग १० चे विभाजन करून नदीपलिकडे प्रभाग १२ ला जोडण्यात आल्याने शिवसेनेचे माजी शहर प्रमुख सूरज परदेशी यांच्यासह तेथील नागरिकांनी मुख्याधिकारी सह निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
शहरातील प्रभाग १० ला लागून असलेला वाडी चौक आणि गुरव गल्ली हा भाग लांब अंतरावर असलेल्या बोरी नदी पलीकडे असलेल्या प्रभाग १२ ला जोडण्यात आला आहे. आयोगाने नेमून दिलेल्या सीमांच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने पालिकेला देखील काम करणे गैरसोयीचे ठरणार आहे.
निवेदनावर सूरज परदेशी ,अतुल कुलकर्णी ,सुनील देव , दर्शन भावसार ,वंदना गुरव ,सुशीला जाधव , गुलाब गुरव ,संजय गुरव , नितीन सोमनाथ ,भागवत ,पंढरींनाथ भावसार , कल्पना बोरसे ,सागर जाधव , नितीन गुरव ,मीरा बागुल , माला बागुल ,दर्शन गुरव ,सूनन्दा सोनार ,लता शिंपी ,केशव पुराणिक ,आरोही भावसार , सोनाली जाधव,सुनंदा पाटील आदींच्या सह्या आहेत.




