
अमळनेर:- शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील जवखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ग्रामपंचायतीतर्फे सालाबादप्रमाणे शिक्षकांचा गुणगौरव सोहळा पार पडला.
यावेळी जि प प्राथ शाळा जवखेडे येथील उपशिक्षिका रेखा वकीलाल पाटील यांना ग्रामपंचायत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच 2025 या वर्षीच्या शिक्षक दिनी जि प प्राथ शाळा जवखेडे ता अमळनेर येथील शिक्षिका व ढेकू खूर्द ता अमळनेर येथील रहिवासी यांना जळगाव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या शिक्षिका सुनिता रत्नाकर पाटील व त्याचे पती श्री रत्नाकर संभाजीराव पाटील यांचा जवखेडे ग्रामपंचायत , शाळा व्यवस्थापन समिती ,जि प प्राथ शाळेच्या शिक्षकवृंद यांच्या तर्फे शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. दोघाही शिक्षिकांना मयुर पाटील यांचेकडून शिक्षक दिनानिमित्त सप्रेम भेट देण्यात आली.तसेच प्रकाश यशवंत पाटील यांचे वतीने स्वर्गीय यशवंत दत्तु पाटील यांच्या स्मरणार्थ आदर्श विद्यार्थी पुरस्कार रोख रक्कम व सन्मानचिन्ह, तसेच चंद्रभान यशवंत पाटील यांचे वतीने स्वर्गीय कृष्णाबाई यशवंत पाटील स्मरणार्थ आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार रोख रक्कम व स्मृतिचिन्ह, सुरेश(सर) यशवंत पाटील यांच्या वतीने ग्रामपंचायतीकडून दरवर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकास रोख रक्कम व मानपत्र अशी वेगवेगळी बक्षिसे येत्या 26 जानेवारी पासून विद्यार्थ्यांना देण्याचे मयुर पाटील यांनी जाहीर केले. यावेळी कार्यक्रमासाठी जवखेडे गावाच्या प्रथम नागरीक सरपंच जयश्री माळी, उपसरपंच दिनकर पाटील,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता पाटील, संदिप पाटील ,बाला उपक्रम समिती अध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष रविंद्र माळी,मा.सरपंच नेताजी पाटील, मा.उपसरपंच चुडामण पाटील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निंबा पाटील, जिजाबराव पाटील हिरा चव्हाण , मनिषा धनगर, ग्रामसेवक न्हाळदे आप्पा, भुषण जैन, जगदिश पाटील,व सर्व अंगणवाडी सेविका बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. यावेळी निंबा पाटील सर, संदिप पाटील मुख्याध्यापक छगन पाटील यांनी व पुरस्कारार्थी शिक्षकांनी मनोगते व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुर पाटील यांनी व सुत्रसंचालन श्रीम अर्चना बागुल यांनी व आभार प्रदर्शन मुकेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक छगन पाटील, उपशिक्षक रत्नप्रभा साळुंखे, रेखा पाटील, सुनिता पाटील, अर्चना बागुल, मुकेश पाटील, माधवराव ठाकरे, युवा प्रशिक्षणार्थी अनिता बोरसे यांनी परिश्रम घेतले.




