
अमळनेर:- आठवड्याभरापासून सुरु असलेल्या रिपरिप
पावसामुळे पिंपळे खु,पिंपळे बु,चिमनपुरी,मंगरूळ, आर्डी, शिरसाळे,अटाळे परिसरातील खरीप हंगाम धोक्यात
आला आहे. सर्वाधिक फटका लाख मोलाच्या कापसाला बसत आहे. सततच्या पावसामुळे कापूस या पिकावर ती मर रोगाची सुरुवात झाली असून मुळे सडू लागली आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली बुडाल्याने शेतकरी हा चिंतेत आहे. शेतकऱ्यांच्या आतुन नुकसान होत आहे.
तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे शासनाने करावे असे शेतकरी व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.




