
अमळनेर : शहरात ईद मिरवणुकीत आरडाओरडा केल्यामुळे एकमेकांवर दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोपनीय अंमलदार सिद्धांत शिसोदे यांनी फिर्याद दिली की ८ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता ईद सणानिमित्त मिरवणूक गांधलीपुरा पोलीस चौकीसमोरून जात असताना चौकीच्या मागून शरद दिलीप पाटील (रा शिरूड नाका) , गौरव जयवंत देसले (रा वड चौक शारदा कॉलनी), मनीष रवींद्र महाजन (रा शिरूड नाका), राहुल रमेश भोई (रा शिवशक्ती चौक) व त्यांच्यासोबत असणारे सात ते आठ जण आरडाओरड करत होते. म्हणून म्हणून मिरवणूक मार्गामधून चौकीच्या पाठीमागे वसीम उर्फ मोहसीन मेहमूद बागवान (रा कोष्टीवाडा), इम्रान शेख सलीम (रा शाहआलम नगर), शाहीन बेग असलम बेग मिर्झा (रा गांधलीपुरा), साहिलखान आमिद खान पठाण (रा गांधलीपुरा) ,इस्माईल जहुर पठाण (रा जिनगर गल्ली), शाहरुख (पूर्ण नाव माहीत नाही) व त्यांच्यासोबत ८ ते दहा साथीदार यांनी आरडाओरड करणाऱ्यांच्या दिशेने जाऊन अंदाधुंद दगडफेक केली. त्याला प्रतिहल्ला म्हणून आरडाओरड करणाऱ्यांनी यांच्या दिशेने अंदाधुंद दगडफेक केली. हे पाहून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, उपनिरीक्षक समाधान गायकवाड, मिलिंद बोरसे ,अशोक साळुंखे दोन्ही जमावाच्या दिशेने धावले त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली. त्यात पोलिसांनाही दगड लागले. नंतर दोन्ही गटातील आरोपी पळून गेले. म्हणून दोन्ही गटाच्या दहा जण व इतर अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११० , १३२ ,१२१(१) , १८९(२),१९१(२),१९१(३), १९०, महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१) ,३७(३), १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.




