
बोहरा गावापर्यंत वाहत आल्यावर आढळले ४८ वर्षीय इसमाचे प्रेत
अमळनेर : भुसावळ येथील एका इसमाने तापी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ८ रोजी घडली होती. या इसमाचे प्रेत तापी नदीतून वाहून अमळनेर तालुक्यातील बोहरा येथे आल्याने मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धनंजय दत्तात्रय ठेंग (वय ४८ रा गडकरी नगर न्यू राम मंदिर जवळ भुसावळ) याने ८ रोजी भुसावळ येथील तापी नदीवरील पुलावर बूट काढून मोटरसायकल पुलावर लावून उडी मारून आत्महत्या केली होती. भुसावळ पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. त्याचे प्रेत ११ रोजी अमळनेर तालुक्यातील बोहरा येथे आढळून आले. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहेत.




