
अमळनेर:- महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई व जळगाव जिल्हा रुग्णालय अंतर्गत डापकु कार्यालय आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांच्या माध्यमातून तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अंमळनेर माय ग्रेंट टी आय प्रोजेक्ट( स्थलांतरीत प्रकल्प) जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर येथील एम एस मुदडा हायस्कूल माळीवाडा अंमळनेर येथे IEC activity camping कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळेस राष्ट्रविकास संस्थेमार्फत डॉ. प्रिया पटेल यांनी आजारावर आपले आरोग्य कसे राहील व आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच राष्ट्रविकास संस्थेचे जळगाव जिल्ह्यातील स्थलांतरीत प्रकल्पाचे मॅनेजर अमोल सूर्यवंशी यांनी सर्वांना एचआयव्ही व तसेच टीबी या आजारावर मार्गदर्शन केले त्या आजारावर आपल्या ग्रामीण रुग्णालय येथे उपचार मोफत करण्यात येतो असे सांगण्यात आले त्यामध्ये आपल्या परिसरातील किंवा ओळखीचे असे व्यक्ती असतील तर त्यांना समाजात चांगली वागणूक देऊन त्यांच्यासोबत आदर ठेवला पाहीजेत असे देखील सांगण्यात आले. त्या प्रसंगी आयसीटीसी अमळनेरचे समुपदेशक अश्वमेध पाटील यांनी सर्वांना एचआयव्ही व एड्स याच्यातला फरक व या आजाराचे लक्षण काय आहेत हे सविस्तर सांगितले व तसेच किशोरवयीन वयोगटातील मुलाना व मुलींना त्याविषयी मार्गदर्शन केले व आपल्या शरीरात बऱ्याचशा मोठ्या आजारांवर आपल्याला सामोरे जावे लागते कॅन्सर सारख्या आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते म्हणून याच्यावर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळेस येथील एम एस मुदडा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नेहा पाटील, उपशिक्षक सुनील पाटील, किशोर पाटील , राजेंद्र महाजन , राहुल पाटील उपस्थित होते व आयसीटीसी विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ देवेंद्र मोरे हे देखील उपस्थित होते. तसेच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रविकास संस्थेचे स्थलांतरीत कामगारांवर काम करणारे पीएल राहुल सुर्यवंशी, उपेंद्र पाटील,हे देखील उपस्थित होते व ओआरडब्ल्यू हिलाल पाटील यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्यासह सर्वांचे आभार व्यक्त केले.




