
करणखेडा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर :- शेतात लाकडे तोडायला गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील करणखेडा येथे घडली असून आरोपीविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करणखेडा येथील २२ वर्षीय विवाहित महिला १२ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास शेतात लाकडे तोडायला गेली असता तिथे गोविंद युवराज भील (रा. करणखेडा) हा आला. सदर विवाहितेने त्याला लाकडाची मोळी उचलून डोक्याला ठेवायला सांगितली. त्यावेळी त्याने सदर महिलेच्या डोक्यावर मोळी ठेवली आणि त्यानंतर तिची साडी ताणून लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने सदर महिला लाकडे फेकत घाबरून पळून गेली. व घरी जाऊन आपल्या नातेवाईकांना झालेला प्रकार सांगितला. सदर पीडित महिलेच्या तक्रारीवरून मारवड पोलिसांत गोविंद युवराज भील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.




