
अडेलतट्टू अधिकारी व प्रशासनाविरुद्ध सोमवारपासून घेणार आक्रमक भूमिका…
अमळनेर:- अप्पर तापी प्रकल्प हतनूर अंतर्गत संपादित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा म्हणून आमरण उपोषणास बसलेल्या ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या आंदोलनाचा चौथा दिवस उलटला तरी प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याने सोमवार पासून शेतकरी आक्रमक आंदोलन करण्याचा मानसिकतेत आहे.
अनवर्दे ता.चोपडा येथील ७७ शेतकऱ्यांच्या जमिनी अप्पर तापी प्रकल्प हतनूर करिता संयुक्त मोजणी नुसार संपादित होऊन पाटाच्या पाण्याचा लाभ लाभार्थी शेतकऱ्यांना मिळतो आहे मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाले त्या शेतकऱ्यांना मात्र तीन दशकांपासून पारदर्शक व संपूर्ण मोबदला मिळालेला नाही.
संबंधित शेतकरी १० सप्टेंबर पासून उपोषणाला बसलेले असून शेतकऱ्यांच्या प्राणांतिक आमरण उपोषणाचा चौथा दिवस उलटलेला असताना जिल्हा भूसंपादन अधिकारी व तापी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कोणतीही स्पष्ट भूमिका घेत नसून त्यांनी आंदोलनाकडे साथ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे चोपडा तालुक्यातील अनवर्दे खु. येथील शेतकरी व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याच्या मानसिकेत आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी उपोषण करते उमराव बोरसे वय ७३ वर्षे हे आपल्या तब्येतीची परवाना करता शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणावर ठाम आहेत. आंदोलनकर्त्यांच्यावतीने कार्यकारी अभियंता निम्न तापी प्रकल्प यांना रोज एक लेखी निवेदन देण्यात येत आहे.
हातेड खुर्द,बुधगाव, अनवर्दे खु शिवारातील शेतकरी गेल्या ३० वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत असून त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याने या सर्व शेतकऱ्यांच्यावतीने शेतकरी उमराव भाऊराव बोरसे हे आमरण उपोषणाला १० सप्टेंबर पासून बसलेले आहे. उपोषणकर्त्यांचा उपोषणाचा ४ था दिवस आहे. संबंधित कार्यालयाकडून याबाबत कोणतेही कार्यवाही होताना दिसत नाही. उपोषणकर्ते उमराव बोरसे यांचे सह अनवर्दे येथील सरपंच सचिन शिरसाट व उपसरपंच महेश पवार यांचे सह पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे पदाधिकारी सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे , निंभोरा सरपंच सुनिल पाटील यांनी उपोषणकर्त्यांसह चौथ्या दिवशी आंदोलन स्थळी उपस्थिती दिली. उपोषण आंदोलनास रामराव पाटील ,धनंजय पाटील ,चंद्रकांत पाटील , धनराज बोरसे, शुभम बोरसे ,सचिन धनगर, धीरज धनगर आदींसह ग्रामस्थांनी आंदोलन सहभाग घेतला.




