
मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत राबवला उपक्रम
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे ग्रामविकास व पंचायतराज विभाग मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत वृक्षदिंडी घेऊन गावातून वृक्षारोपण करण्याचे वृक्षदिंडीतून आवाहन करण्यात आले. यावेळी कै सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर वृक्ष घेऊन गावातून वृक्षदिंडी काढली.

सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोठा सहभाग घेऊन गावात वृक्षदिंडी काढून तिन्ही गावांमध्ये पालखीमध्ये वृक्षांची आरती करण्यात आली व ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी, पिंपळे बु चे माजी सरपंच योगेश पाटील ,पिंपळे खु चे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील ग्रामपंचायत सदस्य , ग्राम विकास अधिकारी के के लंकेश , सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील,अंगणवाडी सेविका आशा सेविका मुख्याध्यापक सी.एन पाटील,शिक्षक डी बी पाटील,जी जे पाटील हर्षल पवार, निकम सर श्रीमती गुमानर मॅडम श्रीमती बाविस्कर मॅडम शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी ,मोठ्या संख्येने ग्रामस्थ पुरुषोत्तम चौधरी, नाना चौधरी, आदी उपस्थित होते.




