भाच्याने सांडशीने मारत फोडले डोके, आत्या गंभीर जखमी….
अमळनेर : मोबाईल वरील फ्री फायर गेम साठी आत्याने पैसे दिले नाहीत म्हणून भाच्याने डोक्यात सांडशी मारून गंभीर जखमी झाल्याची घटना १७ रोजी सकाळी ११ वाजता घडली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

हलीमा बी अब्दुल रशीद (रा ख्वाजा नगर रेल्वे टाकी फाईल) ही घरी असताना तिचा भाचा सकलैन मोहिद्दीन पिंजारी याने तिच्याकडे मला पैसे लागणार आहेत. पैसे दे नाहीतर तुला आजोबांच्या घरात राहू देणार नाही अशी धमकी दिली. तेव्हा तिच्या वडिलांनी राशीद शेख नादर तिच्या भाच्याला सहा हजार रुपये लागले. परंतु त्याने दहा हजार रुपये लागणार असल्याचे सांगितले. माझ्याकडे पैसे नाही असे हलीमा ने सांगताच सकलैन याने सांडशीने तिच्या डोक्यात मारले आणि तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तिच्या वडिलांनी भांडण सोडवून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. चक्कर येत नसल्याने तिला पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्यात आले होते. उपचार घेऊन आल्यानन्तर अमळनेर पोलीस स्टेशनला सकलैन यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८(१),३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या तरुणाने मोबाईल मधील फ्री फायर गेम साठी पैसे मागत असल्याचे आरोपीने सांगितले. गुन्ह्याचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.




