
तरुण दांपत्याचा जागीच करुण अंत, एक गंभीर जखमी…
अमळनेर : अमळनेर हेडावे रस्त्यावर आयशर गाडी आणि दोन मोटरसायकल अपघातात पती पत्नी जागीच ठार झाली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की 25 रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास हेडावे रस्त्यावर दोन मोटारसायकल आणि आयशर अशा तिहेरी अपघात एकरूखी येथील विश्वनाथ हिंमत भिल (वय 30) आणि ज्योती विश्वनाथ भिल वय 25 हे जागीच ठार झाले असून दुसरा मोटारसायकल चालक बाळू साहेबराव पाटील (वय 50) हा जबर जखमी झाला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने पथक पाठवले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमीला उपचारासाठी आणि मृतांचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले आहे.
विश्वनाथाचा संसारच उद्ध्वस्त…
या अपघातात मयत झालेला विश्वनाथ भिल हा एकुलता एक असून अपघातात त्याची पत्नीही मरण पावल्याने संपूर्ण परिवारच कोलमडला आहे. विश्वनाथ याचे आई वडील वयोवृद्ध असून एक ९ वर्षाचा तर दुसरा ७ वर्षाचा मुलगा आहे. कमावता एकुलता एक मुलगा गेल्याने वयोवृद्ध आईवडिलांचा आधार गेला असून आईवडिलांची सावली हरपल्याने दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. त्यामुळे उघड्यावर आलेल्या परिवाराला व उघड्यावर आलेल्या मुलांना आधार देण्याची गरज आहे.




