
अमळनेर : सामाजिक वनीकरण विभागातर्फे सेवा पंधरवाड्यात तालुक्यातील मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.

अमळनेर येथील सामाजिक वनीकरण विभागाला ५ हजार ५०० झाडांचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत १२०० झाडे लावण्यात आली आहेत. मंगरूळ येथे मुख्याध्यापक प्रकाश पाटील तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते झाडे लावण्यात आलीत. यावेळी वनाधिकारी सुनीता धनगर , वनपाल वैशाली साळी , वनरक्षक स्मिता शिंदे , वनरक्षक दिनेश देवरे , भटू पाटील, अशोक सूर्यवंशी , प्रभुदास पाटील , संजय पाटील ,राजेंद्र पाटील , सुषमा सोनवणे , शीतल चव्हाण , सीमा पाटील हजर होते.




