
अमळनेर– जनतेच्या सेवेसाठी, राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “सेवा पंधरवडा” राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत महसूल विभाग व अमळनेर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ रोजी इंदिरा भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, नायब तहसीलदार प्रशांत धमके, अजय कुलकर्णी, उपाधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, नगर अभियंता सुनील पाटील, अजित लांडे, नगरपरिषद लेखापाल सुदर्शन शामनानी, कृणाल कोष्टी, विद्युत अभियंता कुणाल महाले, अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी, आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष माणिक यांसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला ५०० ते ६०० नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
अमळनेर नगरपरिषदेतर्फे करण्यात आलेली कामे
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ११ महिला बचत गटांना व्यवसायासाठी ७३. लाख ६० हजार रुपये लाख कर्जवाटप.
पीएम स्वनिधी योजना अंतर्गत १७ लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.विश्वकर्मा योजना व बचत गट यासंबंधी आवश्यक मार्गदर्शन नागरिकांना देण्यात आले.
विद्युत विभाग:
पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना अंतर्गत नागरिकांना सौरऊर्जेच्या माध्यमातून स्वच्छ, पर्यावरणपूरक व मोफत वीज निर्मितीचे फायदे समजावून सांगण्यात आले. या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून वीज बचत कशी करता येते, वीज बिलात कशी मोठी कपात होते तसेच अतिरिक्त वीज निर्मिती केल्यास तिचा वितरण कंपन्यांकडे साठा होऊन ती वीज नंतर कशी वापरता येते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरामध्ये नागरिकांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व शासनाकडून मिळणारे अनुदान याची सविस्तर माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबी ऊर्जा निर्मिती या तिहेरी उद्दिष्टांना गती मिळणार असल्याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
बांधकाम विभाग
प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अंतर्गत घरकुल वाटप व परवानगीचे वितरण.
बांधकाम परवानगी वाटप – ७ लाभार्थी (प्रातिनिधिक स्वरूपात).
घरकुल चावी वाटप – ८ लाभार्थी (प्रातिनिधिक स्वरूपात)




