
अमळनेर:- येथील वीरांगना सहेली ग्रुपकडून १७ ते २३ सप्टेंबरदरम्यान विरांगना सहेली ग्रुपने 18 उपक्रम घेऊन जायन्ट्स सप्ताह साजरा करण्यात आला.

17 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात येथे कचरा मुक्त अभियान करून सप्ताहचे उद्घाटन करण्यात आले.प्लास्टिक मुक्त अभियानांतर्गत भाजी बाजारात कापडी पिशव्यांचा वाटप करण्यात आलं.पाणी बचत जनजागृती अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंगची जागृती करण्यात आली. तांबेपुरातील सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर वृक्षारोपण,तरुण युवतींना एकत्र आणून यंग जायन्ट्स स्थापना करण्यात आली.व्यसनमुक्ती अंतर्गत शहरात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले व्यसनमुक्ती उपक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन श्रीमती पूजा पाटील होत्या.तसेच चोपडा तालुक्यातील वेले येथे नवनीत जैन यांचा स्मरणार्थ वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले यात अनमोल सहकार्य निलिमा सोनकुसरे, अपेक्षा पवार, शोभा शिंदे आणि श्रीमती भारती कोळी यांनी केले.तसेच दर्शना गुरव ब्युटीशियन यांचे एक दिवसीय पार्लर प्रशिक्षण ठेवण्यात आले,बचत गट या महिलांचा स्टॉल लावत असता सत्कार करण्यात आला,मुंदडा पार्क येथे राहुल मोरे यांचे गरबा शिबिर ठेवण्यात आले. यात अनमोल सहकार्य सौ.मेघा मुंदडा यांचे होते.आणि 23 सप्टेंबर रोजी श्रीमती भानुबेन शहा यांच्या गौशाळा येथे डॉ.सचिन पाटील(पशुवैद्य) यांनी गौमातेवर लंपी आजारावर परीक्षण करत,वंध्यत्व निवारण चाचणी करत आजारी गौमातेवर औषधोपचार केले. आणि कार्यक्रमाचा समारोप साने नगर अमळनेर येथे सेंद्रिय खताचे फायदे आणि शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती देत केली.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री महेश पाटील (नगरसेवक) आणि मार्गदर्शक म्हणून प्रदिप ऍग्रो चे संचालक बियाणे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा व्यवसाय असलेले श्री.प्रदीप हिरामण कंखरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाला सौ.दिपिका सोनवणे,सौ.कल्पना पाटील सौ.सुदर्शना पाटील,सौ.शोभा पाटील सौ.राजश्री पाटील, सौ.अपेक्षा पवार सौ योगिता पांडे,श्रीमती पूजा पाटील, श्रीमती भारती कोळी,सौ.दर्शना गुरव उपस्थित होते.




