
अमळनेर : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पलटी झाल्याने एक शिक्षक व त्याची पत्नी गंभीर झाल्याची घटना २८ रोजी साडे सहा वाजेच्या सुमारास टाकरखेडा रस्त्यावर किल्ल्याजवळ घडली.

राजमल मोहनलाल संचेती हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवर भरधाव वेगाने चांदणी कुऱ्हे गावाकडून अमळनेरकडे येत असताना त्यांची दुचाकी पलटी होऊन जोरात रस्त्यावर आदळले. त्यांच्या नाकातोंडातून रक्त आले. तेथे उपस्थित असलेले दिलीप सोनवणे यांनी त्यांना एका चार चाकीतून डॉ अनिल शिंदे यांच्या दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले.




