
अमळनेर:- दुचाकीवर जाणारा युवक मारवड रस्त्यावरील उड्डाणपुलावरून खाली पडून जखमी झाल्याची घटना घडली असून सदर युवकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२७ रोजी प्रताप महाविद्यालयाजवळील रेल्वे उड्डाणपुलावरून वासरे येथील निलेश पाटील हा तरुण वेगाने मोटरसायकल चालवताना कठड्याला ठोकला जाऊन पुलाच्या खाली पडल्याने जखमी झाला होता. ह्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सदर युवकावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




