
अमळनेर : शहरातील डीडी नगर भागात नागरिक घरात झोपलेले असताना पाच घरे फोडून किरकोळ रक्कम चोरीस गेल्याची घटना २९ रोजी पहाटे घडली.

डीडी नगर भागातील छोटुनाथ रंगनाथ भावसार , कैलास लोटन पाटील ,तुषार पाटील , अभिषेक पाटील यांच्या घरातील सदस्य वरच्या मजल्यावर झोपले असताना खालच्या मजल्यावर अज्ञात चोरट्यानी हत्यार किंवा कटर च्या साहाय्याने कुलूप कोंडे कापून घरात घुसून घरातील कपाट तोडून साहित्य अस्ताव्यस्त फेकून चोरण्याचा प्रयत्न केला. तसेच सुधाकर पाटील हे बाहेर गावी गेले असताना त्यांचेही घर फोडले. छोटू भावसार आणि कैलास पाटील यांच्या घरातील किरकोळ रक्कम चोरीस गेली.
अभिषेक पाटील यांनी ११२ डायल करून पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , विनोद भोई , प्रशांत पाटील यांनी पाहणी केली. मात्र किरकोळ चोरी असल्याने नागरिकांनी फिर्याद दिली नसल्याने गुन्हे दाखल झाले नाहीत. तरी देखील पोलीस निरीक्षक निकम यांनी पोलिसांचे पथक तपासाला पाठवले आहेत.




