
अमळनेर:- येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुनील पंडितराव पाटील यांच्या नेतृत्वातून जायन्ट्स ग्रुप अमळनेर ने स्वखर्चातून गेल्या सप्ताह भरात दर्जेदार विविध सामाजिक उपक्रम राबविले.

१७ ते २३ तारखेदरम्यान वृक्षारोपण व संवर्धन, दंत चिकित्सा शिबिर , नेत्र रोग चिकित्सा, सांस्कृतिक कार्यक्रम गरबा प्रशिक्षण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ग्रामीण शाळेवर व्यक्तिमत्व विकास शिबिर, नेत्रदान विषयी जनजागृती व नेत्रदान साठी नाव नोंदणी, सेंद्रिय खते वापरा विषयी शेतकरी जागृती,आनंदाश्रम वेले येथे अन्नदान, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना सुरूची भोजन, वेले वृद्धाश्रम येथे चादर वाटप, सेंद्रिय खत बनविण्याची प्रक्रिया आणि घटक विषयी शेतकरी कार्यशाळा , ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्याना टूथ पेस्ट,ब्रश वाटप इ उपक्रम घेण्यात आले.
याप्रसंगी जायन्ट्स ग्रुप अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, उपाध्यक्ष डॉ महेश पाटील, खजिनदार राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील.सचिन ओसवाल, प्रशांत पाटील उपाध्यक्ष राजेंद्र भावसार , सचिव संदीप महाजन, रमेश महाजन , संतोष वाघ, संजय मुंडके, ॲड राजेंद्र पी चौधरी, दीपक मनिलाल पाटील, महेश पाटील,अश्विन पाटील,भटू पाटील,प्रो. ए एम करमपूरवाला सर ,प्रो, प्रवीण भावसार सर, संजय मुंडके, डॉ.निलेश शिंगाणे आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.




