
अमळनेर:- येथील शोभा रघुनाथ शिंदे यांची अखिल भारतीय नाथपंथी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

नाथपंथी समाजाला गुरू गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ मिळवून दिल्याबद्दल नवीन मुंबई येथे अखिल भारतीय नाथपंथी महासंघाच्या वतीन वनमंत्री गणेश नाईक यांचा आभार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अमळनेर येथील शोभा रघुनाथ शिंदे यांची विभागीय अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. महासंघाचे सचिव योगेश बर्वे, अनिल कानडे, बालकनाथ वरपे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बाळकृष्ण जाधव, कलावती वरपे, ज्ञानेश्वर लाड आदी उपस्थित होते.




