
अमळनेर-सालाबादा प्रमाणे यावर्षीही “विजयादशमी” निमीत्ताने गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता रावणदहन व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी लोकप्रतिनिधींसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.सदर कार्यक्रम खाटेश्वर महादेव मंदिरा समोर रूबजीनगर अमळनेर येथे होणार आहे.तरी सर्वानी याप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन पवनपुत्र व्यायामशाळेचे अध्यक्ष राजकुमार कोराणी व उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे आणि “पवनपुत्र व्यायाम शाळा मित्र परिवाराने केले आहे.




