
अमळनेर : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रद्द केलेली अमळनेर तालुक्यातील सात्री व मुडी येथील दोन्ही रेशन दुकाने पूर्ववत आधीच्या संस्थाना देण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा आदेश रद्द केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ११ जुलै रोजी सात्री येथील श्री छत्रपती शिवाजी राजे बहुउद्देशीय संस्था यांचे दुकान क्रमांक १०१ चा परवाना रद्द करून डांगरी येथील नितळ हरी वाणी यांच्या दुकान नम्बर १०० ला जोडण्यात आले होते. तसेच निर्मलाई फौंडेशन चे मुडी येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १११ देखील रद्द करून हिंगोणे बुद्रुक येथील विमलबाई दशरथ पाटील यांच्या दुकान नम्बर ११२ ला जोडण्यात आले होते. यावर महेंद्र शालीग्राम बोरसे यांनी नाशिक विभागीय उपायुक्त (पुरवठा विभाग) यांच्याकडे पुनर्परीक्षण अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेऊन उपयुक्त प्रज्ञा बडे मिसाळ यांनी २३ सप्टेंबर रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ११ जुलै रोजी दिलेला आदेश रद्द करून दुकांनाचा दिलेला ताबा काढून पूर्ववत छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्था आणि निर्मलाई फौंडेशन याना जोडण्यात आली आहेत.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दुकानदारांना त्यांनी लाभार्थ्यांची तक्रार येणार नाही , दररोज दुकान उघडे राहील , ग्राहकांशी सौजन्य ठेवावे , तपासणीला आलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे , धान्य नियमित आणि योग्य प्रमाणात वाटावे आदी अटींवर दुकान परत जोडण्याचे आदेश दिले आहेत.





