
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथील ७५ वर्षीय वृद्ध महिला ३० सप्टेंबरपासून बेपत्ता झाली असून याप्रकरणी मारवड पोलिसांत हरवल्याची तक्रार करण्यात आली आहे.

अमळगाव येथील सुमनबाई अंबादास कोळी (वय ७५) ह्या दिनांक ३० रोजी दुपारी तीन वाजेपासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची माहिती असून कोणालाही दिसून आल्या न आल्याने घरच्यांनी नातेवाईक व परिसरात शोध घेतला. मात्र कोणताही तपास न लागल्याने त्यांच्या मुलाने मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




