
अमळनेर : तालुक्यातील निम येथे नवरात्रोत्सवात भिल्ल वस्तीत अचानक देवीच्या मूर्तीच्या डोळ्यात अश्रू येऊ लागल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. त्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

एकलव्य नवरात्र मंडळाने कालिका मातेच्या मूर्तिची स्थापना केली होती. एक दिवस आरती करताना देवीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचे पाहून नागरीक आश्चर्यचकित झाले. हळूहळू ही वार्ता गावात पसरताच नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांनी व्हिडीओ काढले. एकच दिवस हा प्रकार घडला होता अशी माहिती भक्त दीपक पवार यांनी दिली. देवीच्या डोळ्यातून अश्रू येण्याचे शास्त्रीय कारण मात्र समजू शकले नाही. मात्र साऱ्यांनी देवीचा चमत्कार समजून भक्त देवीसमोर नतमस्तक झाले. ह्या अश्रूमागे काही शास्त्रीय कारण आहे की दैवी शक्ती यावर आता जोरदार चर्चा सुरू आहेत.




