
अमळनेर-लायन्स क्लब, अमळनेर तर्फे सेवा सप्ताह उपक्रम अंतर्गत मानसिक स्वास्थ्य व कल्याणासाठी आयोजित तणाव व्यवस्थापन सेमिनारचे आयोजन आज रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सुजान मंगल कार्यालय, अमळनेर येथे करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून डॉ. रोहन शाह, धुळे (मानसोपचार तज्ज्ञ) उपस्थित राहणार आहेत. यासाठी सहभागी व्हा-तणाव हा सर्व वयोगटातील मूक साथीदार आहे, यातून चिंता, नैराश्य, मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग वाढतात.कार्यक्षमता व आनंदी जीवनावर थेट परिणाम होतो. विद्यार्थी, शिक्षक, पालक, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरीक, महिला यांना तणाव नियंत्रणासाठी वैज्ञानिक उपाय, व्यावहारिक मार्गदर्शन व सोपी तंत्रे शिकण्याची संधी मिळणार आहे.
तरी सदर सेमिनारमध्ये सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन लायन्स क्लब तर्फे प्रोजेक्ट चेअरमन प्रदिप जैन
,चेतन जैन, प्रशांत सिंघवी तसेच अध्यक्ष डॉ संदीप जोशी,सचिव महेंद्र पाटील व कोषाध्यक्ष नितीन विंचूरकर व
सर्व सदस्य, लायन्स क्लब, अमळनेर यांनी केले आहे.




