
अमळनेर– दोन कोटी खर्चून तयार केलेल्या पिंपळे रस्त्याला पडल्या मोठ्या भेगा या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. या बातमीची नगरपरिषद प्रशासनाने त्वरित दखल घेत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी पिंपळे रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला अंदाजपत्रकात तीन ते चार मीटर वर ग्रुव्ह कटर करण्याची तरतूद असल्याने लगेचच ठेकेदारास सूचना देऊन कामास सुरुवात करण्यात आली. तसेच पडलेल्या भेगा बुजवण्याकरता अन्य उपाययोजना करण्यास संबंधित ठेकेदारास सूचना केल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या या भूमिकेचे पिंपळे रोड परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे.
पालिकेचे अभियंते कामांची पाहणी करतात की नाही यावर प्रश्नचिन्ह ?
सदर कामाच्या गुणवत्तेबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर दुरुस्ती आणि कटिंग करण्यास सुरुवात झाली. मात्र पालिका अभियंता यांचा गलथान कारभार यामुळे समोर आला असून कोट्यवधीच्या निधीची कामे अशी पाहणी न करता व बेजबाबदारपणे सुरू असतील तर इतर बाबतीत बोलायलाच नको अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांचा कराचा पैसा वाया जाऊ नये म्हणून पालिका अभियंत्यांनी अंदाजपत्रक तपासून कामाची पाहणी करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.





