
अमळनेर : तालुक्यातील लोणे येथून अज्ञात चोरट्यानी अनिल राजाराम पाटील यांच्या मालकीच्या गट नम्बर २९(२) मधील जनावरांच्या गोठ्यातून ७२ हजार रुपये किमतीच्या चार म्हशी चोरून नेल्याची घटना ३ रोजी रात्री ते ४ रोजी पहाटे दरम्यान घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.





